Onion News | साठवणीतील उन्हाळ कांदा संपला असून पाणी असून देखील अपेक्षित माल निघत नसल्याची गत लाल कांद्याची झाली आहे. पोळ व लाल कांद्याचे पीक खराब झाले असून उन्हाळी कांद्यासाठी रोप तयार करण्यात अडचणी येत असल्याने यावर्षी पाणी असून देखील कांद्याचे पीक घेण्यात अडचणी येत आहेत.
Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात चढ-उतार कायम
परतीच्या पावसामुळे तीनही सीझनच्या कांद्याला फटका
परतीच्या पावसामुळे कसमादे भाग पाणीमय झाला असला तरीही कांदा पिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. कलमाद्वारे भागात कांद्याचे तीन टप्प्यात कांदा पीक घेतले जाते. पोळ्याच्या टप्प्यात लागवड केली जाणारा पोळ कांदा, दिवाळीच्या आधी लाल व दिवाळीनंतर उन्हाळा कांद्याची लागवड केली जाते. परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे या तीनही सीजनच्या कांद्याला फटका बसला असून पोळ कांदा काढणीवर असताना आणि लाल कांद्याची लागवड झाली असताना परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले असल्याने करपा होऊन हे कांद्याचे पीक शेतातच खराब झाले आहे. तर जास्त पाणी, दव, धुके यामुळे कांद्याची पात खराब होऊन कांद्याची वाढ देखील खुंटली आहे.
Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी दिवाळीनंतर आवक मंदावली
पाणी व दर असूनही कांदा पीक घेण्यात अडचण
दरम्यान, उन्हाळ कांद्याचे रोप तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी उळे टाकले असून या पावसामुळे तेही मरून गेले आहेत. यावर्षी तीन-तीन वेळा उळे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उन्हाळी कांद्याचे रोप उशिरा तयार होणार असल्याने या कांद्याची लागवड लांबणीवर पडणार आहे. तर कांद्याला भाव असल्याने सर्व शेतकरी कांदा पीक घेण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु सतत येणाऱ्या अडथळ्यांमुळे शेतकरी हताश झाले आहेत. (Onion News)