Onion Garlic Rate | मागच्या वर्षीचा भूषण दुष्काळ आणि यावर्षी महिनाभर उशिरा सुरू झालेला पाऊसामुळे उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात झालेली घट यामुळे कांद्याची आवक साधारणता 50% पर्यंत घसरली असून परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 रुपये किलो झाले असून लसूण देखील 400 ते 450 किलो पर्यंत पोहोचले आहे त्याचबरोबर मेथीची जुडी देखील 40 रुपये व कोथिंबीर 30 रुपयांना मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगला शेक बसत आहे.
Onion Rate | मंचर बाजार समितीत जुन्या कांद्याला चांगला दर; आज मिळाला उच्चांकी बाजारभाव
साधारणतः 25000 क्विंटल कांदा दररोज विक्रीसाठी बाजारात
सध्या जिल्ह्यातील खाजगी व सहकारी तत्वावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू असून दिवाळीपूर्वी चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल वर विकला जाणारा उन्हाळा कांदा आता पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल वर पोहोचला आहे गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता टप्प्याटप्प्याने व विक्रीसाठी हा कांदा बाजारात येत असून साधारणतः 25000 क्विंटल कांदा दररोज विक्रीसाठी येत असल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रमुखांनी सांगितले आहे लाल कांद्याचे उत्पादन उशिराने झाल्यामुळे अजून देखील पुरेशा प्रमाणात हा कांदा बाजारात विक्रीसाठी आलेला नाही.
दिवाळीनंतर भाज्यांचे दर कडाडलेले
उन्हाळ, खरीप, लेट खरीप अशा तीनही कांद्यांची दररोज सरासरी 50 ते 60 हजार क्विंटल आवक होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली असून मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत असल्याने दरात एका आठवड्यात दोन हजारांची वाढ झाली आहे. डिसेंबरपर्यंत हेच दर कायम राहतील. त्यानंतर आवक वाढत गेल्यास दर कमी व्हायला सुरुवात होईल. त्याकरिता जवळजवळ महिनाभर वाट पहावी लागेल. असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मेथीची जुडी 50 रुपये, तर कोथिंबीर 30 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे एकंदरीत दिवाळीनंतर भाज्यांचे दर कडाडलेले पाहायला मिळत आहेत.
Onion News | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; किसान एक्सप्रेस 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू रहाणार
लसणीचेही भाव गगनाला भिडले
तर भाज्यांबरोबर लसणीचेही भाव गगनाला भिडले असून नाशिक जिल्ह्यात नारायणगाव, इंदोर येथून लसूण विक्रीसाठी येतो. त्याची आवक घटल्याने भाव शिगेला पोहोचले असून किरकोळ बाजारात लसूण 400 ते 450 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. लसणाचा हंगाम संपायला आला असून नवीन लसूण बाजारात येण्यासाठी अजून 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे लसणाचे दर पुढील काही महिने तेजीत राहण्याची शक्यता आहे. (Onion Garlic Rate)