Nashik Rain | नाशिकमधील ‘ही’ धरणं ओवरफ्लो; जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा..?


नाशिक :  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली या भागात मुसळधार पाऊस बरसत असून, या जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्यातील इतर भागात जरी जोरदार पाऊस असला उत्तर महाराष्ट्राला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान, अखेर या आठवड्यात नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे नागरिक सुखावले आहे. 

आज सकाळपासूनच शहर परिसरात पावसाची (Rain) संततधार सुरु असून, इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) धरण पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणी साठयात (Nashik Dam) मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे दारणा धरणातून (Darna Dam) पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर, नंदुर मध्यमेश्वर धरणही ओवरफ्लो झाले आहे. 

दरम्यान, संपूर्ण नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) पाणीसाठा हा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, इगतपुरी तालुक्यातील इतर धारणांचाही पाणीसाठा वाढल्याने दारणा धरणातून पाणी सोडले जात आहे. आज सकाळपासून दारणा धरणातून 9 हजार 334 क्यूसेक वेगाने दारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने दारणा नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दारणा धरणातून दारणा नदीमार्गे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी जात असून, जायकवाडीच्या पाणी पातळीतही वाढ होण्यास यामुळे मदत होत आहे.  (Nashik Rain)

Nashik Rain | दिंडोरी तालुक्याला अवकाळीने झोडपलं; अजूनही लोकप्रतिनिधी गप्प!

Nashik Rain | उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस 

दरम्यान, जुलै महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून, आता उत्तर महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात चांगला पाऊस येत्या काही दिवसांत पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

 Nashik News | नाशिककरांना दिलासा..! धरणांचा पाणीसाठा वाढला; पुढील दोन दिवस रेड अलर्ट

कोणत्या धरणात किती पाणीसाठी 

  • गंगापूर (Gangapur Dam) – 70%
  • कश्यपी (Kashyapi Dam) – 32.56%
  • वाघाड (Waghad Dam) – 40.40% 
  • दारणा (Darna Dam) – 85.51%
  • भावली (Bhaval Dami) – 100%
  • गिरणा (Girna Dam) – 16.12%
  • मुकणे (Mukne Dam) – 38.50%
  • पालखेड (Palkhed Dam) – 54.06%
  • कडवा (kadwa Dam) – 86.02%
  • करंजवण (Karanjvan Dam) – 22.83%
  • चणकापूर (Chankapur Dam) – 45.53%
  • ओझरखेड (Ozarkhed Dam) – 0.00%
  • वालदेवी (Waldevi Dam) – 78.02%
  • भोजपुर (Bhojpur Dam) – 44.88%
  • नांदूर मध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar Dam) – 100%