Nashik Onion | सध्या राज्यात हवामानात अनेक बदल घडत असून या सर्व हवामानातील बदलांमुळे शेती उत्पादनांवर याचा मोठा परिणाम होत आहे. यातच मागील पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही त्यातच जूलै -नोव्हेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात अवकाळीने पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमामात नुकसान केले. दरम्यान, निसर्गातील वाढणारे बदल आणि कांद्याचे भावातील चढउतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रमुख जिल्हा मानला जातो. यातच कांदा निर्यातबंदी केल्यानंतर नासिक जिल्ह्यात कांंद्याच्या दरात सतत घसरण पहायला मिळत असून यामुळे कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अगदी मेटाकूटीला आलेले आहेत. कांदा प्रश्नाबाबत जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंत जाधव यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत कांदा प्रश्नाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nashik Onion | शेतकऱ्यांना चांगला फायदा
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून नाशिक जिल्ह्यात कांदा शेतकरी उत्पादक कंपनीकडून डीहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जाधव यांनी शासनाकडे केलेली होती.
आता यावरच राज्याचे कृषीमंत्री यांनी एक मोठी घोषमा केली आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व्यापक जनहिताचा असल्याने या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून 60 टक्के ऐवजी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे.