Onion News | नाशिक जिल्हा हा सध्या अनेक कारणास्तव चर्चेत असून यातच यावर्षीच्या 27 व्या राष्ट्रीय यूवा महोत्सवासाठी नाशिक शहराची निवड करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर नाशिक नगरी सध्या सजताना दिसत आहे. याच निमित्त देशाचे पं. नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिक नगरीत येणार आहेत. यातच सध्या कांदा प्रश्न नाशिक जिल्ह्यात पेटलेला असताना पंतप्रधान मोदी यांनी कांदा प्रश्नी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाला वेळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
Onion News | मंत्री गिरीश महाजन यांना पत्र
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांना या संदर्भातील पत्र देण्यात आले. या पत्रात असे नमुद करण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून यावेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा प्रश्नावरील काही महत्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदीजी यांची समक्ष भेट घेण्याची इच्छा आहे. सरकारच्या धोरणामुळे सातत्याने होत असलेले कांदा उत्पादकांचे नुकसान आणि कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना इत्यादी बाबी थेट पंतप्रधान मोदीजी यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलावे असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटते.
Onion News | मोदीजींसाठी कांदा प्रश्न तुलनेत सोपा…
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आतापर्यंत या देशातील अनेक जटील प्रश्न सहजपणे सोडवलेले आहेत आणि यातच कांदा प्रश्न त्या तुलनेत सोपा आहे. यामुळे या चर्चेतून पंतप्रधान मोदीजी निश्चितपणे या प्रश्नावर तोडगा काढतील, असा विश्वास वाटतो. आपल्या माध्यमातून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत 12 जानेवारी रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून घडवून आणावी आणि चर्चेसाठी वेळ राखीव ठेवावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी कांदा उत्पादकांना भेटीसाठी वेळ देणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. कांदा प्रश्नामुळे नाशिक जिल्हा हा चांगलाच चर्चेत असताना 27 व्या राष्ट्रीय यूवा महोत्सवासाठी नाशकात देशाचे पं. मोदी नाशकात येणार आहे. आता या निमित्ताने कांदा प्रश्न सुटणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.