Nashik News | येवल्यात चोरट्यांचा कांद्यावर डल्ला; शेतात साठवलेला 5 क्विंटल कांदा केला लंपास


Nashik News | नाशिक जिल्ह्यात घरपोडी, वाहनांची, चोरी चेन चोरी यासारख्या चोरीच्या घटना नवीन नाहीत. अशातच येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून चक्क 5 क्विंटल कांदा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याला 30 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या चाळीत साठवलेला उन्हाळा कांदा संपण्याच्या अवस्थेत आहे. उन्हाळ कांद्याला 5000 च्या आसपास दर मिळत असून हळूहळू लाल कांदा देखील बाजारात यायला सुरुवात झाली आहे.

Nashik News | निफाड गारठले! पारा 7 अंशापर्यंत घसरला; द्राक्ष बागायतदारांची चिंता वढली

येवल्यात चोरट्यांचा कांद्यावर डल्ला

यावर्षी परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतात निघणाऱ्या कांद्याचे प्रमाण कमी झाले असून लाल कांद्याला बाजारामध्ये 4000 च्या आसपास दर मिळत आहे. त्यामुळे कांद्याला सोन्याचे मोल आले आहे. अशा परिस्थितीत आता चोरट्यांनी देखील शेतात पडलेल्या कांद्याला लक्ष करत येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे सुभाष पाटील या शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेल्या लाल कांद्यावर डल्ला टाकला आहे.

Nashik News | चांदवडमध्ये टोमॅटोच्या शेतात बेकायदेशीर गांज्याची लागवड; शेतकरी अटकेत

30 नोव्हेंबर रोजी रात्री घडली घडला

चाळीत साठवलेला हा कांदा विक्रीला नेण्यापूर्वी कांद्याच्या पोळीतून शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री पाटील यांच्या शेतातून सुमारे 5 क्विंटल कांद्याची चोरी झाली. यामुळे त्यांना 30 हजारांचा आर्थिक भुरदंड बसला असून याप्रकरणी, चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी. अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. (Nashik News)