Nashik News | राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून निफाड तालुक्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात घट कायम आहे.आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात तापमानाचा पारा ‘सात’ अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे.
Nashik News | चांदवडमध्ये टोमॅटोच्या शेतात बेकायदेशीर गांज्याची लागवड; शेतकरी अटकेत
द्राक्ष मालाला थंडीमुळे धोका
दरवर्षी निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरता असतो. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच 7 अंशावर घसरला असून त्यामुळे तयार होत असलेल्या द्राक्ष मालाची फुगवण थांबणार आहे. तर परिपक द्राक्ष मालाला कडाक्याच्या थंडीमुळे तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. घसरत्या तापमानामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.
Nashik News | नाशिक गारठले; तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत घसरला
गोठवणाऱ्या थंडीपासून द्राक्ष मालाची निगा राखण्याकरिता आवश्यकतेनुसार द्राक्ष बागायतदारांना पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे लागत असून द्राक्षबागात शेकोटी पेटवून धुराद्वारे उष्णता निर्माण करावी. अशी महत्त्वपूर्ण काळजी द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष माल वाचवण्यासाठी घ्यावी. असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांच्याकडून करण्यात आले आहे. (Nashik News)