Igatpuri | इगतपुरी तालुक्यातील भातपिकावर आधी मावा, तुडतुडे व करप्याचा प्रादुर्भाव आता परतीच्या अवकाळी पावसाने भातपिक भुईसपाट


Igatpuri | आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यातील सोंगणीवर आलेल्या हळी वाणासह गरी वाणाचे भात पीक भुईसपाट झाले आहे. बागायती टोमॅटो, वांगे व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन भात पिकावर करपा, मावा, तुडतुडे यांचाही प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. या सर्वच नुकसाणीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असुन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊन भात पिकाचे उत्पन्न घटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी बांधवांचे पंचनामे करून लाभ मिळावा अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Igatpuri | दिलासादायक पावसामुळे बळीराजा सुखावला; इगतपुरीत भात लावणीला सुरुवात

भात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील मुख्य असणाऱ्या भात पिकावर दरवर्षीच नानाविध संकट येत असल्याचे नवीन नाही. याही वर्षी महागडे खते, मजुरी यासह अन्य कामांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करून लागवड केलेल्या भात पिकावर आधीच मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अन्य बागायती पिकांचेही परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच आठवडाभरापासून वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसाने कमी दिवसात येणाऱ्या हळी वाण असलेल्या व सोंगणीवर आलेल्या तसेच इतरही भातपिके पावसाने झोडपल्याने भुईसपाट झाले आहेत. अधिक कालावधीपर्यंत भात पिकाच्या तुरंब्या पाण्यात राहुन त्याला मोड फुटल्याचे बघावयास मिळत आहे.

Igatpuri | टाकेद शिष्टमंडळाने तहसीलदारांसमोर वाचला स्थानिक समस्यांचा पाढा

नुकसानभरपाईसह पिक विमा मंजुर करण्याची मागणी

दरम्यान, विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असली तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या नुकसाणीबाबत कार्यवाही होणेबाबत आवाज उठवणे गरजेचे असुन शासणाने नुकसानग्रस्त भातपिकांसह अन्य बागायती पिकांचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसह पिकविमाही मंजुर करावा अशी मागणी इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. (Igatpuri)