Heavy Rain | राज्यात पावसाचा हाहाकार; घरांमध्ये पाणी, जनावरही वाहून गेली


Heavy Rain | काही दिवसांकरिता विश्रांती घेत पावसाने पुन्हा एकदा राज्यभर हजेरी लावली आहे. राज्याचा दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यातील काही भाग कालपासून पाण्याखाली गेला असून हिंगोली, छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेड जिल्ह्यामधील हदगाव मधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याचा वेढा बसला आहे. या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतकऱ्यांची अनेक जनावर देखील वाहून गेली आहेत. त्याचबरोबर 30 शेतकरी शेतामध्ये, घरांच्या छतावर अडकून पडले आहेत. तर एस.डी.आर.एफ.ची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.

Weather Update | राज्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका?

Heavy Rain | पावसाची कोसळधार

नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसला असून सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. नांदेड शहरामधील मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोदावरी सोबतच आसना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून नांदेड शहरा बरोबरच वसमत आणि इतर 50 ते 60 गावांचा संपर्क तुटला असून पाऊस काय कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

Weather News | यंदा बैल पोळ्याला राज्यभर दमदार पाऊस; पंजाबराव डखांनी वर्तवला हवामान अंदाज

नदी नाल्यांना पूर तर, पावसाचा जोर कायम

कालपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने तग धरला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज तासभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर वाढवला आहे. तसेच नांदेड शहरातील काही सकल भागामध्ये पाणीच पाणी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विष्णूनगर, श्रावस्ती नगर, हमालपुरा, गोकुळ नगर या भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून पावसाचा जोर वाढल्याने नांदेड जिल्ह्यात पुरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. तसेच लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मनार नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर मनावर नदीने देखील आपली धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाकडून मनावर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rain)