Health Tips | सावधान! सतत बसून काम करताय? मग स्मृतिभ्रंश होण्याचा धोका


Health Tips | आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय राहणं खूप महत्वाचं असतं. आजकाल या सक्रिय जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार त्रास देऊ शकतात. या संदर्भात एक संशोधन समोर आलं असून ज्यामध्ये असे आढळून आलं आहे की, 10 तासांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. हा आजार नसून ही एक न्यूरोडीजनरेटिव्ह स्थिती आहे.

JAMA जर्नलमध्ये सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं होतं की, 60 आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 50,000 प्रौढांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात असे आढळून आले की, बैठी वागणूक डिमेंशियाचा धोका वाढवू शकते तसेच जे लोक दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ बसतात त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका जास्त असतो.

Aadhaar-PAN | आधार-पॅन लिंक नसेल तर मोठा आर्थिक फटका बसणार

स्मृतिभ्रंश म्हणजे नेमकं काय?

या संदर्भात न्यूरोलॉजी डॉक्टर सांगतात की, स्मृतिभ्रंशला ‘मेमरी लॉस’ असं म्हणतात. स्मृती आणि मेंदूच्या इतर कार्यावर परिणाम करणारा हा आजार असून स्मृतिभ्रंशाची हा वाढत जाणारा रोग आहे. त्याची सुरुवात स्मरणशक्ती कमी होण्यापासून होतो आणि नंतर रुग्णाची संभाषण करण्याची क्षमता संपत असते. हा आजार विचार, स्मरणशक्ती आणि भाषा यांना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागांशी संबंधित असून आजकाल त्यांच्या कामामुळे प्रत्येकजण एकाच ठिकाणी आणि स्क्रीनसमोर बसून तासनतास घालवत आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंशाचा हा धोका आणखी वाढतो. मग यासाठी काय करता येईल? (Health Tips)

Breaking News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय

एक छोटा ब्रेक घेत रहा

जर तुम्हाला दिवसभर एकाच जागी बसावे लागत असेल तर थोडा वेळ काढून चालण्याची – फिरण्याची सवय लावा. काही मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्याने होणारा त्रास कमी होत असतो.

नियमित व्यायामासाठी वेळ काढा

हलका एरोबिक व्यायाम मेंदूसाठी चांगला असतो. यामध्ये तुम्ही जलद चालणे, पोहणे आणि सायकलिंगचाही समावेश करू शकतात.

खेळ खेळत राहा

एका संशोधनात असे आढळून आलेल आहे की, क्रॉसवर्ड आणि बुद्धीबळ खेळल्याने वृद्धांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका 11 टक्क्यांनी कमी होतो म्हणून खेळ खेळणे महत्वाचे मानले जाते.

योग किंवा ध्यान

सकाळी लवकर उठा आणि योग आणि ध्यानासाठी वेळ काढा त्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले राहील.