Garlic Rate | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान लसणाची 63 क्विंटल आवक झाली असून त्याला 18,000 ते 37 हजार 500 प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तसेच 32 हजार रुपये सरासरी दर मिळाला. त्यात आवक कमी होत असल्यामुळे दरात पुन्हा क्विंटल मागे हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Onion Garlic Rate | आवक घटल्याने कांदा, लसणाचे भाव तेजीत
भाजीपाल्याबरोबर फळांच्या आवकेनुसार दरात चढ-उतार
आठवड्यात भाजीपाल्याबरोबर फळांच्या आवकेनुसार दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले असून वालपापडी, घेवड्याची 10 हजार 123 क्विंटलआवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल 400 ते 7 हजार असा दर मिळाला असून 5,300 रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. तर घेवड्याला 1,500 ते 3,500 रु. असा प्रतिक्विंटल दर मिळाला असून 2,350 रु. असा सरासरी दर मिळाला आहे. हिरव्या मिरचीची आवक 200 क्विंटल झाली असून लवंगी मिरचीला 2,200 ते 4,300 असा प्रतिक्विंटल तर 3 हजार रु. सरासरी दर मिळाला आहे.
Garlic News | ‘या’ पीकाची लागवड करून शेतकरी झाले करोडपती; शेतात लावले सीसीटीव्ही
कांद्याला काय दर मिळाला?
उन्हाळ कांद्याची 2,081 क्विंटल आवक झाली असून उन्हाळ कांद्याला 4,500 ते 5,655 असा प्रतिक्विंटल तर 5 हजार रुपये सरासरी दर मिळाला आहे. पोळ कांद्याची 3,202 क्विंटल आवक झाली असून त्याला 1,100 ते 4,200 असा प्रतिक्विंटल तर 3 हजार 800 रुपये सरासरी दर मिळाला आहे. तर बटाट्याचे 9,409 क्विंटल झाली असून त्याला 2,200 ते 2,900 प्रतिक्विंटल व 2,650 सरासरी दर मिळाला आहे. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला 50 ते 550 प्रतिक्विंटल तर 2,250 सरासरी दर मिळाला आहे. वांग्याला 700 ते 1,100 व सरासरी 850 फ्लॉवर 160 ते 410 सरासरी 280 रुपये तर दर मिळाला आहे. कोबीला 150 ते 300 व सरासरी 250 रुपये असा दर मिळाला आहे. (Garlic Rate)