Deola | मुसळधार पावसाने देवळ्यात पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यात शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी विजांच्या कडकडासह वादळी वारा व ढगफुटी सदृश्य झालेल्या जोरदार पावसाने पश्चिम भागातील कोलथी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, दुसरीकडे उभ्या पिकांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लागवड केलेला कांदा, कांदा रोप, मका, द्राक्ष, डाळींब आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे खर्डे परिसरात रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Deola | खा. भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पावसामुळे चिंचबारी घाटातील रस्ता वाहून गेला

उमराने येथे सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शनिवारी १९ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.३० च्या दरम्यान, विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चिंतित झाला असून अनेक भागात शेताचे बांध तोडून पाणी वाहून गेल्याने कांदा बियाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे, जनावरांना देखील सांभाळणे मुश्किल झाले होते. विजांचा प्रचंड कडकडात होत असल्याने नागरिक भयभीत झाले होते. देवळा तालुक्यातील कापशी, भावडे, वाखारी येथे डोंगर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाझर तलाव भरून शेतांमधून पाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाखारी-चिंचबारी परिसारत झालेल्या पावसामुळे चिंचबारी घाटातील रस्ता वाहून गेला. तर मेशी, दहिवड, रणदेवपाडा, देवपूरपाडा, महालपाटणे, निंबोळा, खामखेडा विठेवाडी, खर्डा, परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. याठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने फरची पुलांवरून पाणी वाहत आहे. तर रस्ते वाहून गेले आहेत.

Deola | खर्डे परिसरात अतिवृष्टी; कोलथी नदीच्या पूर पाण्यात एक जण वाहून गेल्याची माहिती

पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

देवेंद्र निकम (वाखारी) यांच्या शेतातील उभ्या असलेल्या मक्याच्या पिकातून पाणी वाहत असल्याने नुकसान झाले आहे. सरसकट पंचनामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी महागडी कांदा बियाणे (उळे) पोळ कांदा, मका, सोयाबीन आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. उमराणे व चिचवे येथे झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला. नदीकाठच्या घरात पाणी घुसले. घटनास्थळी पालकमंत्री दादा भुसे व आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. मांजरवाडी परिसरात कांद्यासह इतर पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले. याठिकाणी नुकसानग्रस्त भागाची केदा आहेर यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. (Deola)