Agro News | सीताफळासाठी यंदाचा हंगाम समाधानकारक


Agro News | एकीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे सिताफळ बागांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे हाच पाऊस डोंगरदराचे सीताफळाला फायदेशीर ठरला आहे. यंदा डोंगरदऱ्यातील सीताफळाची चांगली आवक होत असून दुसरीकडे सीताफळ फळबागांमधूनही आता तोडणीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारात फळाचा आकार व दर्जानुसार दर मिळत असून सरासरी दर हा 40 ते 50 रुपये प्रतिकिलो पर्यंत मिळत आहे. तर यंदाच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून हंगाम समाधानकारक राहील अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.

Agro News | सोयाबीन-कापूस अनुदानापासून काही शेतकरी वंचित; लाभ मिळवण्यासाठी ‘ही’ गोष्ट असणे गरजेचे!

सिताफळ उत्पन्नात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

महाराष्ट्रमध्ये सीताफळाने एक लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र व्यापलेले आहे. शिवाय डोंगरदऱ्यामध्येही सीताफळाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्र सीताफळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर येतो. मागील काही वर्षांपासून सीताफळ प्रक्रिया उद्योगही स्थिरावत आहे. त्यात सीताफळ हे दुर्लक्षित फळ आहे. या पिकात संशोधनाबाबत अनेक उणीवा सांगितल्या जातात.कमी पाणी, कमी मशागत व संसाधनात हमखास उत्पन्न देणारे व दीर्घ आयुष्यमान असणारे हे सिताफळाचे पीक मागील काही वर्षात कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या पसंतीस उरले आहे. (Agro News)

“माझी दोन एकरात बाग असून, यंदा एका झाडावर 50 ते 60 सीताफळे आहेत. माझे वडील, मी, भाऊ तिघे मिळून अकोल्यात स्वतःच विक्री करीत आहोत. सुरुवातीच्या काळात 120 रु. किलोने विक्री केली. परंतु आत्ता 80 ते 100 रुपयांपर्यंत फळ विकले जाते आहे. थंडीचा जोर वाढल्यानंतर मागणी अधिक असते हा मागील दोन-तीन वर्षांतील अनुभव आहे. -हरीष धोत्रे, सीताफळ उत्पादक तथा विक्रेते, विवरा, जि. अकोला