Agro News | सोयाबीन-कापूस अनुदानापासून काही शेतकरी वंचित; लाभ मिळवण्यासाठी ‘ही’ गोष्ट असणे गरजेचे!


Agro News | 2023 च्या खरीप हंगामातील कापूस-सोयाबीन उत्पादकांना राज्य सरकारने हेक्टरी 5000 रुपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,398 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. राज्यातील 96 लाख 787 खातेदारांना एकूण 4,112 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे.

Agro News | नाशकात ‘कृषीथॉन प्रदर्शन’ 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार

संयुक्त खातेदारांच्या वितरणात अडचणी

या अनुदानाकरिता राज्यातील एकूण पात्र खातेदारांपैकी 80 लाख वैयक्तिक खाते तर 60 लाख संयुक्त खाती आहेत. तर वैयक्तिक खातेदारांपैकी 13 लाख खातेदारांनी आपले आधार संमतीपत्र कृषी विभागाकडे सादर केलेली नाही. संयुक्त खातेदारांसाठी सामायिक क्षेत्रामध्ये नावे असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असणे अनिवार्य असून एकाच व्यक्तीच्या नावे पैसे जमा केले जाणार आहेत. पण कोणाच्या नावावर किती क्षेत्र आहे त्यानुसार, संयुक्त खातेदारांनी एकमेकांत ठरवून वाटप करायचे आहे. अनेक सामाईक खातेदार नोकरी-धंद्या निमित्त बाहेरगावी असल्यामुळे संमती पत्र देण्यास अडचणी येत आहेत. परंतु ज्या संयुक्त खातेदारांनी स्वाक्षऱ्या करून संमती पत्र दिले आहेत, त्यांच्या नॉमिनेट केलेल्या खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे संयुक्त खातेदारांनी लवकरात लवकर आपले समजून करण्यात आली आहे.

संमतीपत्र जमा झाल्यावर लाभ मिळणार

पहिल्या टप्प्यामध्ये 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना दोन लाख 398 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. पण त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच 3 ऑक्टोबर पर्यंत 6,872 खातेदारांच्या म्हणजे एकूण 51 हजार 115 शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 कोटी 76 लाख रुपये वाटप केले गेले. जसजशी संमितीपत्रे जमा होतील त्याप्रमाणे खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे.आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभआतापर्यंत 64 लाख 25 हजार 428 एकूण खातेदार असून, 49 लाख 99 हजार 389 शेतकरी आहेत. तर 2420 कोटी 69 लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. (Agro News)

Agro News | सांगली जिल्ह्यात मका, ज्वारीच्या पेरणीला सुरुवात

“जशी संमती पत्र जमा होतील तसे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाईल संयुक्त आणि वैयक्तिक खातेदारांनी लवकरात लवकर संमतीपत्र जमा करावीत आणि अनुदानाचा लाभ घ्यावा.”– विनयकुमार आवटे (संचालक, कृषी आयुक्तालय)