Agro News | परतीच्या पावसामुळे ज्वारीची पेरणी लांबणीवर


Agro News | रब्बी हंगामात सांगोला तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीच्या पेरणीला सुरुवात केली असून तालुक्यात सोमवार दि. 7 ऑक्टोबरपर्यंत 1,384 हेक्टर वर ज्वारी तर 1094 हेक्टरवर मका अशा एकूण 2475 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

Agro News | सीताफळासाठी यंदाचा हंगाम समाधानकारक

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

सांगोला तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, 15 सप्टेंबरनंतर शेतकरी रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात करतात. परंतु मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी पेरणी योग्य पावसाची वाट पाहत होता. त्यात गणपती विसर्जनानंतर देखील पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अशातच परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत झाला. दरम्यान, यंदा तालुक्यात 612 मीमी. म्हणजेच 124 टक्के पाऊस झाला असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे पेरणीमध्ये व्यत्यय येत आहे. ज्याचा ज्वारीच्या पेरणीवर परिणाम होऊन पेरा लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे.

पेरणी लांबणीवर गेल्याने उत्पादनावर परिणाम

तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा रब्बी ज्वारी पेरणीसाठी योग्य वेळ होती. परंतु 15 नोव्हेंबर पर्यंत रब्बी ज्वारीच्या पेरण्याला चालणार आहेत. ज्यामुळे परिणामी विलंबाने होणाऱ्या पेरण्यामुळे उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यातच तालुकाभरात अजूनही खरीप बाजरी, मक्याची काढणी, मोडणी व मळणी सुरू असल्याचे चित्र असून, दुसरीकडे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीसाठी मशागत करून ठेवलेल्या शेतामधून ज्वारीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. (Agro News)

Agro News | सोयाबीन-कापूस अनुदानापासून काही शेतकरी वंचित; लाभ मिळवण्यासाठी ‘ही’ गोष्ट असणे गरजेचे!

“सांगोला तालुक्यामध्ये पावसाची सरासरी 468. 03 मी.मी. असून तालुक्यात 1 जून ते 7 ऑक्टोबरपर्यंत सरासरी पेक्षा अधिक म्हणजेच 612 मि.मी. पाऊस झाला. यंदा सरासरी पेक्षा 144 मि.मी. अधिक पाऊस झाला असून सध्या ज्या शेतात वाफसा आहे. तेथे शेतकऱ्यांकडून ज्वारीची पेरणी चालू आहे. वाफसा आल्यानंतर पेरणीला वेग येणार आहे.” – शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला’