Agro News | सध्या बाजारात टोमॅटोला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र असून पिंपळगाव बरोबरच गिरणारे टोमॅटो मार्केटही आता सुरू झाले आहे. त्यामुळे आवक वाढली असून बाजारभाव समाधानकारक नाहीत. त्यातच नाशिकच्या टोमॅटो पट्ट्यात काढण्याच्या कामाला वेग आला असून यासाठी जवळपास कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 900 रुपयांपर्यंत दर मिळत आहे त्यामुळे बाजारभावापेक्षा दुप्पट मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकरी मात्र हवालदली झाले आहेत.
Agro News | हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी कमी भाव मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये नाराजी
टोमॅटो काढण्यासाठी तब्बल 600 ते 900 रुपयांपर्यंत रोजची मजुरी
नाशिक तालुक्यातील गिरणारे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे टोमॅटो लागवड येथे मोठ्या प्रमाणात केली जाते आणि याच ठिकाणी म्हणजेच गिरणारे गावातच टोमॅटो मार्केट असल्याने ने आण करणे सोपे जाते. परंतु यंदा टोमॅटो काढणीलाच शेतकरी हतबल झाला असून एकीकडे 400 ते 450 पर्यंत टोमॅटोच्या कॅटरला भाव आहे. तर दुसरीकडे हेच टोमॅटो काढण्यासाठी तब्बल 600 ते 900 रुपयांपर्यंत दररोज मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे बाजारभाव आणि मजुरीचे दर यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे.
उत्पादन खर्चातील 25 ते 30 टक्के खर्च मजुरीवर होत असल्याचे चित्र
तर सध्या टोमॅटो, द्राक्ष, सोयाबीन, मका काढणीसाठी मजुरांची मागणी जोरात असल्यामुळे आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मजुरांना चांगला रोजगार मिळत आहे. शेती हाच मजुरांना वर्षभर रोजगार देणारा व्यवसाय आहे. परंतु उत्पादन खर्चातील 25 ते 30 टक्के खर्च मजुरीवर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टोमॅटोला अपेक्षित भाव नसतानाही मजुरी मात्र दुप्पट द्यावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. शिवाय मजुरांचा तुटवडा ही देखील एक मोठी अडचण आहे.
Agro News | दिवाळ सणामुळे बाजार समित्या बंद; सोयाबिन विक्रीसाठी शेतकरी प्रतिक्षेत
कमी भाव दरामुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत
त्याचबरोबर, सध्या गिरणारे पट्ट्यात टोमॅटो काढणीला वेग आला असून जवळपास रोज 30 हजारहून अधिक शेतमजुरांना रोजचा रोजगार शेतकरी देत आहेत. परंतु ऐन दिवाळी टोमॅटोचे भाव उतरले त्यातून सणासुदीला 600 ते 900 रुपये रोज मजुरी द्यावी लागते आहे. यातून मिळणारे उत्पन्न व मजुरीचे सणात वाढलेले दर यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून टोमॅटोला सध्या प्रतीकेटर 250 ते 350 पर्यंत भाव असून, हा फार कमी भाव असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Agro News)