Agro News | नाशकात चोरट्यांची कांदा खळ्यावर डल्ला; 14 ते 15 गोणी कांदा चोरीला, सीसीटिव्ही देखील तोडले


Agro News | नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा खळ्यावर असणारे सीसीटीव्ही तोडत 14 ते 15 गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपळगाव येथील कांदा व्यापारी हर्षल खाबिया यांचे उंबरखेड रोडवर कांद्याचे खळे आहे. या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी गाडीमध्ये येऊन कांद्याची चोरी केली. तसेच सीसीटीव्ही तोडण्याचा प्रयत्न करून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणारा डीव्हीआर देखील चोरून नेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर उंबरखेड रोड येथील किराणा दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Agro News | खानदेशात कापसाची आवक कमी; दरात देखील घसरण

कांदा असोसिएशनची चौकशीची मागणी

तर शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत असून यापूर्वी देखील चिंचखेड रोड परिसरात मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हर्षल साबिया यांच्या खळ्यावर चोरी झाल्यानंतर, शहरातील कांदा असोसिएशनने पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना निवेदन चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी, सोहनलाल भंडारी, गणेश बनकर, विश्वास मोरे सतीश मोरे, सुरेश खोडे, आनंद मणियार, नेमीचंद धाडीवाल, बापू पाटील, रुपेश शहा, हेमंत मुथा, वीरेंद्र बाफना, केतन पुरकर, जीवन बाफना, संदीप हिरे, योगेश वाबळे, संकेत पारख, संतोष ठक्कर यांच्यासह अन्य कांदा व्यापारी उपस्थित होते. (Agro News)