Agro News | सांगली जिल्ह्यात मका, ज्वारीच्या पेरणीला सुरुवात


Agro News | सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागामध्ये जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात शेतकऱ्याने ज्वारी आणि मका पिकांची पेरणी सुरू केली असून या दोन्ही पिकांचा 621 हेक्टर वर पेरा झाला आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये पेरणीला गती येईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यामध्ये 1 ते 30 सप्टेंबर या काळात सरासरी 140 मीटर पावसाची नोंद झाली असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. ज्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असून जत, कवठेमहांकाळ याचा अन्य तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी या पावसावर सुरू होणार आहे.

Agro News | अमरावतीत संत्र्याच्या भावावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये वाद

या भागात मका ज्वारीच्या पेरणीला सुरुवात

तर जत, आटपाडी, कवठेमहाकाळ या तालुक्यातील उडीद, मुगाची, काढणी, जवळपास, आटोपली आहे. ज्यामुळे जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात शेतकऱ्यांनी मका आणि ज्वारी पिकांच्या प्रेरणेला सुरुवात केली असून जत तालुक्यातील ज्वारी 349, मका 91 असे एकूण 440 हेक्टर वर, तर कवठेमहांकाळ तालुक्यात 68 मका 113 असे एकूण 181 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

इतर रब्बी पिकांचा पेरा लांबणीवर

त्याचबरोबर, जिल्ह्यातील अन्य भागात सोयाबीन, भुईमुगासह अन्य पिके काढणीला आली आहेत. परंतु पावसामुळे शेतात पाणी साचले असल्यामुळे पिकांची काढणी लांबणीवर पडली असून सोयाबीनची 25% तर भुईमुगाची २०% काढणी झाली आहे. त्यामुळे मिरज, वाळवा, कडेगाव, पलूस, शिराळा, तासगाव, खानापूर या तालुक्यांमध्ये रब्बीचा पेरा लांबणीवर पडणार आहे. तर आटपाडी जस कवठेमहांकाळ या तालुक्यात बाजरीची काढली 90% पूर्ण झाली आहे.

Agro News | नाशिकमध्ये आधारभूत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

खत, बियाणांची मागणी

कृषी विभागाकडून रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली असून यंदाच्या रब्बीसाठी दोन लाख 80 हजार 97 हेक्टर वर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार गहू, हरभरा, ज्वारी, मका यासह अन्य पिकांचे 21 हजार 317 क्विंटल सार्वजनिक खाजगी कंपन्यांकडून बियाणांची मागणी केली आहे. तर रब्बी हंगामासाठी एक लाख 80 हजार 615 टन खतांची मागणी केली असून रब्बी हंगामात खाते आणि बियाणांची कमतरता पडणार नाही. याची दक्षता घेण्यात आली आहे. (Agro News)