Soyabean Rate | सोयाबीनच्या आवकेमध्ये 23 टक्क्यांनी वाढ; दरातील घसरण कायम


Soyabean Rate | सोयाबीनच्या दरातील घसरण कायम असून मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत 4,500 प्रती क्विंटल इतकी होती. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीत 3.6 टक्के घट झाली असून आज देखील सोयाबीनला मार्केटमध्ये 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत असल्याचे बाजारा समितीच्या अहवालातून दिसून आले आहे.

Agro News | सांगली जिल्ह्यात मका, ज्वारीच्या पेरणीला सुरुवात

सोयाबीनला आधारभूत किमतीपेक्षा कमी दर

2024-25 या सोयाबीनच्या खरीप हंगामासाठी 4,892 प्रतिक्विंटल ही किमान आधारभूत रक्कम जाहीर करण्यात आली होती. मात्र त्याच्या आधीपासूनच दरात घसरण सुरू असल्याकारणाने, सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किमती या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत व इतरही बाजार समितीमध्ये हेच चित्र पाहायला मिळते आहे.

राष्ट्रीय पातळीवर 23 टक्क्यांनी वाढ

तर एकीकडे, शेतकरी सोयाबीन काढणीला सुरुवात करीत असताना, काही ठिकाणी नव्या सोयाबीनची सध्या आवक होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेमध्ये राष्ट्रीय पातळीवर 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात साधारण 22 सप्टेंबर नंतरही आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Agro News | अमरावतीत संत्र्याच्या भावावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये वाद

काय होते मागील आठवड्यातील दर?

मागील बाजारापैकी आठवड्यात प्रमुख लातूर बाजार सोयाबीनला सरासरी 4,500 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर भेटला होता. तर वाशिम बाजारात सरासरी किमतीत 4,361 रुपये प्रतिक्विंटल होत्या, यात मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात प्रति क्विंटल मागे 4,387 रुपये, अमरावती बाजारात 4,500, अकोला बाजारात 4,485 तर वाशिम बाजारात 4,361 रुपये असा दर मिळाला. (Agro News)