Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात चढ-उतार कायम


Onion Rate | सध्या साठवलेल्या उन्हाळा कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी साठवलेल्या कांद्याच्या विक्रीवर जास्त भर देत आहेत. बाजारात हळूहळू लाल कांद्याची आवकही सुरू झाली असून परराज्यातील कांदाही येण्याची शक्यता असल्याने कांदा विक्री होत आहे. साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजारांचा टप्पा पार केला आहे.

Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी दिवाळीनंतर आवक मंदावली

तर या हंगामातील नवीन लाल कांदा बाजारात क्विंटलला सरासरी दोन ते अडीच हजाराच्या भावात विकला जात असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी टप्प्याटप्प्याने चाळीतील कांदा विक्रीस आणला असून मोजक्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात कांदा शिल्लक असताना भावात तेजी आल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचा लाभ व्यापाऱ्यांसह मर्यादित शेतकऱ्यांनाच होत आहे. भाव वाढले असले तरी दरात चढ-उतार आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाल कांद्याचे आवक सुरू होणार

शेतकरी साठवलेला उन्हाळ कांदा विक्रीकरिता आणत असल्यामुळे येवला येथील बाजार समितीत रोज अडीच ते तीन हजार क्विंटल कांद्याची आवक होत असून जागतिक बाजारात कांद्याला मागणी असल्याने गेल्या आठवड्यापासून क्विंटलचा भाव सहा हजारांवर पोहोचला आहे. शुक्रवारी येथील बाजार समितीत उन्हाळा कांद्याला 6,251 रुपये असा सर्वोच्च भाव मिळाला. मात्र यादरात शंभर ते दोनशे रुपयांनी पुन्हा घट झाली आहे. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड लवकर केली होती. काही शेतकऱ्यांनी कांदा पेरणी ही केली होती. मुगाचे पीक घेऊन लागवड झालेला कांदा अजून आलेला नसला तरी खास कांद्यासाठी शेती रिकामे ठेवून आगामी लागवड केलेला कांदा बाजारात येऊ लागला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लाल कांद्याची मोठी आवक सुरू होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारी यांनी सांगितले.

पावसामुळे खरीप लागवडीचे नुकसान

तर जिल्ह्यात यावेळी पावसामुळे आगाऊ खरीप लागवडी झाल्या असून प्रामुख्याने देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला या तालुक्यांमध्ये खरीप कांद्याच्या लागवडी वाढल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कमी पर्जन्यमान व काढणी काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा लागवडीचे नुकसान झाले असून एकीकडे उन्हाळा कांदा संपुष्टात आला आहे. तर नवीन कांद्याचे नुकसान झाल्याने आवक कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यमुळे पुरवठा कमी होऊन दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

Onion Garlic Rate | आवक घटल्याने कांदा, लसणाचे भाव तेजीत

येवला बाजार समितीत काय मिळाला भाव

शुक्रवारी येवला बाजार समितीत लाल कांद्याला किमान 1,400, कमाल 4,100 तर सरासरी 2,500 व उन्हाळ कांद्याला किमान 2,200, कमाल 6,251 सरासरी 5,600 असा दर मिळाला. तर शनिवारी लाल कांद्याला किमान 1000, कमाल 3,575 व सरासरी 2,000 व उन्हाळ कांद्याला 1,675, कमाल 6,101 सरासरी 5 000 असा दर मिळाला. सोमवारी लाल कांद्याला किमान 700, कमाल 3900 व सरासरी 2,050 व उन्हाळ कांद्याला किमान 2000, कमाल 5,840 व सरासरी 4,700 असा दर मिळाला तर मंगळवारी लाल कांद्याला किमान 1,500 कमाल 4,300 व सरासरी 4,000 असा दर मिळाला. (Onion Rate)