Agro News | साधारण महिनाभरापूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री झालेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्याने 37 शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले आहे. या शेतकऱ्यांची नऊ लाख 56 हजार 960 रुपयांची रक्कम थकीत असून रोख रक्कम देण्याची पद्धत असताना समिती प्रशासन इतके दिवस गप्प का होते? असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
Agro News | लातूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात; वेचणी अभावी कापूस शेतात पडून
बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी केले आंदोलन
ऑक्टोबर महिन्यात जवळपास 37 शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी ‘समृद्धी वेजिटेबल्स फर्मचे’ संदीप उगलमुगले यांच्याकडे सुमारे साडेनऊ लाखांचा टोमॅटो विक्री केला होता. या गोष्टीला महिना उलटला असला तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सौदा पावत्या झळकावत सोमवारी बाजार समितीत आंदोलन केले.
Agro News | यंदा हापूससाठी करावी लागणार प्रतिक्षा; पावसामुळे मोहर प्रक्रिया लांबणीवर
“माझ्या जवळजवळ चाळीस हजार रुपये थकीत आहेत. ते अजून मला मिळालेले नाहीत. बाजार समितीने त्या व्यापाऱ्यावर कारवाई करून आमचे पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करा.”– अनिल चितळकर, शेतकरी, नाशिक.