Onion News | मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सुरु केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून कांद्यासारख्या नाशवंत मालाला थेट रेल्वेने पाठवण्याची सुविधा आता उपलब्ध असणार आहे. शेतीमालासाठी 10 सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. हि किसान समृद्ध एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून दर शनिवारी धावत आहे. ही रेल्वे जबलपूर, सतना, प्रयागराज, आरा, बक्सर व दानापुर या शहरात जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल वेळेवर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.
Onion Rate | मंचर बाजार समितीत जुन्या कांद्याला चांगला दर; आज मिळाला उच्चांकी बाजारभाव
देशातील लहान शेतकऱ्यांना होतोय फायदा
जिल्ह्यातून सफरचंद, डाळिंब, द्राक्ष, कांदा, संत्री, लिंबू आदी शेतमाल परराज्यात जात असतो. त्यातून सुमारे 10 लाख रुपयांचा महसूल रेल्वेला मिळत आहे. ही शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे देशातील लहान शेतकऱ्यांना आपला शेतमाल देशाच्या दूरच्या कानाकोपऱ्यात पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. देशभरात कांद्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे, लासलगाव स्थानकावरून दिल्लीतील किशनगंज, चेन्नईतील कोरुक्कुपेठ व गुहाटी जवळील चांगसारी येथील प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये कांदा पाठवण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील फेडरेशन, नाफेड व एनसीसीएफ यांच्याशी समन्वय साधक शहरी केंद्रांपर्यंत जलद व मोठ्या प्रमाणात वितरण करून बाजारभावातील किमतीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे यातून शक्य झाले आहे.
Onion News | दिवाळ सणामुळे रखडलेले कांद्याचे लिलाव पूर्ववत; काय मिळाला भाव वाचा सविस्तर
भुसावळ विभागाला 1.01 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त
सरकारच्या किंमत नियंत्रणाच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे पाठिंबा मिळाला असून भुसावळ विभागासाठी मालवाहतूक महसूल देखील मिळाला आहे. 17 ऑक्टोबरला 2,680 टन कांदा कसबे सुकेणे ते दिल्ली किशनगंज, 22 ऑक्टोबरला लासलगाव ते चेन्नई कोरुक्कुपेठ 1,328 टन, 26 ऑक्टोबरला 1,334 टन, दिल्ली किशनगंज येथे 1,334 टन कांदा रवाना करण्यात आला असून कसबे सुकेणे ते चांगसारी व 9 नोव्हेंबरला 1,333 टन कांदा लासलगाव ते दिल्ली किशनगंजपर्यंत पाठवून भुसावळ विभागाला 1.01 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. (Onion News)