Onion News | दिवाळ सणामुळे रखडलेले कांद्याचे लिलाव पूर्ववत; काय मिळाला भाव वाचा सविस्तर


Onion News | मागील सहा दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार दि. 4 नोव्हेंबरपासून कांदा आणि भुसार शेतमालांचा लिलाव पूर्ववत झाला आहे. मुख्य बाजारभावरात लाल कांद्याला प्रतिक्विंटाला 3,321 रुपये दर मिळत असून उन्हाळ कांद्याला 4,740 रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. तर शनिवार दि. 2 नोव्हेंबरच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात 500 रुपयांची तर लाल कांद्याच्या कमाल दरात 80 रुपये प्रति क्विंटलची वाढ झाल्याचे दिसून आली आहे.

Onion News | कांद्यावर पिळरोग, करापाचा प्रभाव; कृषी विभागाकडून अद्याप पंचनामे नाहीत

लाल कांद्याच्या दरात किंचित वाढ

लाल कांद्याच्या दरात किंचित भावावाढ दिसत असली तरी उन्हाळ कांदा हा मार्च, एप्रिल महिन्यामध्ये साठवलेला असून त्याच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट व प्रतवारी खालावली आहे. त्यामुळे वाढलेल्या भावाचा फायदा मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

Onion News | इजिप्त आणि तुर्कीमधून आयात केलेल्या कांद्याच्या गुणवत्ता व दरात ताळमेळ नाही

दिवाळ सणामुळे कांदा लिलाव ठप्प

तर सोमवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी 28 वाहनांद्वारे 346 क्विंटल कांद्याची आवक होऊन लाल कांद्याला किमान 1,400 तर कमाल 3,800 व सरासरी 3,321 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्याचबरोबर, उन्हाळा कांद्याची 103 वाहनांतून 1248 क्विंटल आवक झाली असून किमान 2,751 तर कमाल 5,300 व सरासरी 4,770 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. (Onion News)