सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | गुंजाळनगर ता. देवळा येथील पोलीस पाटील व प्रगतिशील शेतकरी योगेश गुंजाळ यांच्या डाळिंब बागेतून रविवारी दि. 27 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञान चोरटयांनी डाळिंब फळांची चोरी केली असून, गुंजाळ यांनी डाळिंब चोरीची देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेतातून मालाची चोरी होत असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Deola | खा. भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
जवळपास 100 झाडांवरील डाळिंब चोरली
गुंजाळनगर ता. देवळा येथील शेतकरी योगेश गुंजाळ यांनी आपल्या साडे तीन एकर क्षत्रामध्ये डाळींबाची तेराशे झाडांची लागवड केली आहे. या झाडांना चांगला बहार आला असून, निर्यातक्षम डाळींब तयार केले आहेत. या फळ बागेत गुंजाळ यांनी सीसीटीव्ही केमेरे देखील बसलवे आहेत. रविवारी दि. २७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी या बागेतून जवळपास शंभर झाडांवरील डाळींब चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे गुंजाळ यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Deola | खा. भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
कॅमेऱ्याच्या सायरनने चोर गोणी शेतातच सोडून पसार
डाळींब चोरी करत असताना चोरट्यांना कॅमेराचा सायरन वाजल्याने त्यांनी काही गोणीत भरून तोडून ठेवलेला माल बागेतच सोडून गेले आहेत. या घटनेने शेतकरी भयभीत झाले असून, पोलिसांनी अशा चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (Deola)