Onion News | फार्मर प्रोड्युसिंग कंपनी मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीकरीता रवाना


Onion News | येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्राने एनसीसीएफ व नाफेडच्या माध्यमातून फार्मर प्रोडूसिंग कंपनीमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीला रवाना झाला आहे. बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी कसबे सुकेणे येथे 42 बॉक्सची कांदा लोडिंग केला जात आहे. हा कांदा सात ते आठ दिवसानंतर दिल्लीतील ग्राहकांना मिळणार आहे.

Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण

सात ते आठ दिवसानंतर कांदा दिल्ली पोचणार

एनसीसीए व नाफेडने कांदा भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत शेतकरी प्रोडूसिंग कंपनीकडून माल खरेदी केला. हा कांदा ग्राहकांना ज्यावेळी बाजारात भाव चढते असतात त्यावेळी स्वस्थ दरात देण्याचा सरकारचा हेतू असतो. परंतु लोडिंग होत असलेला कांदा हा नरम, ओला, खराब अवस्थेत असल्यामुळे याची टिकवण क्षमता 4 ते 5 दिवसांची आहे. हा कांदा 7 ते 8 दिवसानंतर दिल्लीतील ग्राहकांना मिळणार असल्याने तो ग्राहकांच्या उपयोगी पडणार नसल्याचा अंदाज आहे.

Onion News | आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव बंद राहणार

सरकार बरोबर ग्राहकांची ही फसवणूक

यावेळी सोमठाण देश येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख संत यांनी कसबे सुकेणे येथे जाऊन लोडिंग होत असलेल्या कांद्याच्या गोण्या ओतून तपासणी केली असता हा कांदा खराब असल्याचे त्यांना दिसून आल्याने, शेतकरी प्रोडूसर कंपन्या सरकार बरोबरच ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Onion News)