सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | कसमादेमध्ये विशेषतः देवळा तालुक्यातील पुर्व भागात रविवारी दि. १३ रोजी मोठ्या प्रमाणात ढगफुटी सद्रूश्य पाउस झाला. यात शेतात उभे असलेले व काढणीला आलेला, मका, सोयाबीन, कोबी, लागवड झालेला खरीप कांदा, कांद्याची रोप, या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या ठिकाणी आज बुधवार दि. १६ रोजी खासदार भास्कर भगरे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
Deola | खर्डे परिसरात अतिवृष्टी; कोलथी नदीच्या पूर पाण्यात एक जण वाहून गेल्याची माहिती
शेतात पाणी साचल्याने पिके सडण्यास सुरुवात
देवळा तालुक्यातील वासोळ, महाल पाटणे, निंबोळा, मेशी, देवपुरपाडे, रानादेव पाडा, डोंगरगावं, उमरणा, तिसगाव आदी परीसरात दि. १३/१४/१५ या तीन दिवसांत रात्रीच्या वेळी शेकडो मिलिमीटर अवकाळी पाऊस झाल्याने स्थानिक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, कांदा, डाळिंब, कोबीच्या शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने काढणीला आलेली पिके सडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे शेतामध्ये दुर्गंधी देखील पसरली आहे. सतत 3-4 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे 3 दिवस उलटून गेले तरी महालपाटणे, निंबोळा शिवारातील शेतामध्ये एक ते दीड फूट पाणी साचलेले आहे, गुरुवारी खासदार भास्कर भगरे यांनी नुकसान ग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तहसीलदारांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
Deola | अवकाळी पावसाने देवळ्यात शेती पिकांचे आतोनात नुकसान; शेतकरी हवालदिल
यावेळी शेतकऱ्यांनी भगरे यांच्याकडे तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, चेतन सावन्त, गणेश ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.
“मागील तिन चार दिवसांत देवळा तालुक्यातील पुर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उभ्या पिकांचे तसेच काढणीला आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. अस्मानी बरोबरच सुलतानी संकटात बळीराजा सापडला आहे. लोकप्रतींना मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्यास वेळ नाही, क्रुषी तसेच महसूल विभागाने तातडीने पावले उचलुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी. – कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना
“दि. १३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आमच्या शेतातील कोबी, डाळिंब, मका, कांद्याची रोपे यांचं अतोनात नुकसान झाले आहे, सर्व पिकं पाण्याखाली गेले असल्याने ते सडुन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून तातडीने सरसकट सर्व नुकसान भरपाई देण्यात यावी.” -विजय निकम, निंबोळा शिवार