Weather News | पावसाने उसंत घेताच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा बसू लागल्या असून तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे गेला आहे. तर आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
Weather Update | आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
बुधवार 2 ऑक्टोबर रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी भारताच्या बहुतांश भागातून माघार घेतली असून दोन दिवसांपासून मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यास पोषक हवामान असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढणार आहे.
राज्यात उन्हाचा कडाका कायम
शुक्रवार 4 ऑक्टोंबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे राज्यातील सर्वोच्ची 36°c तापमानाची नोंद झाली. अकोला, नागपूर, वर्धा, गडचिरोली येथे तापमानाचा पारा 35 च्या पार होता. तर आज 5 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असून मुख्यतः उघडीप असेल, तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवेचा कमी दाबाचा पट्टा
बांगलादेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर लक्षदीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून दक्षिण केळंपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
Weather Update | राज्यात पावसाचा जोर ओसरताच उन्हाचा कडाका वाढला
या भागात पावसाचा अंदाज
तर आज जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, धुळे, परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट जाहीर. (Weather News)