Agro News | मिरज पूर्व भागात बेळंकी, संतोषवाडी, सलगरे, खटाव परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र वाढले असून या भागातील शेतकरी नैसर्गिक संकटांवर मात करत दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले आहेत. यंदा या शेतकऱ्यांनी आगाप छाटणी न घेता ऑगस्ट सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरमध्ये छाटणी घेण्यास पसंती दर्शवली असून परिसरात फळ छाटणीला सुरूवात केली आहे. मागील वर्षी परिसरातील बागायतदारांनी जुलै ऑगस्टमध्ये आगामी छाटणी घेतल्या होत्या.
परंतु पावसामुळे व दावण्याच्या प्रादुर्भावामुळे बागायतदारांना मध्येच बागा तयार सोडून द्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पावसाचा आणि बाजारपेठेचा अंदाज घेत ऑक्टोबर छाटणी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या द्राक्ष बागेतील कामासाठी मदभावी लोकूर, मंगसुळी सुभाष नगर, मालगाव अशा अनेक भागात शेतमजूर दाखल झाले आहेत.
Agro News | देशातील भव्य कृषी विज्ञान संकुलाचे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
द्राक्ष छाटणीसाठी शेतमजूर गावात दाखल
या द्राक्ष छाटणीच्या कामासाठी महिला कामगारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असून परिसरात द्राक्ष विक्री फेब्रुवारी ते मेदरम्यान होत असते. परंतु मागील वर्षी पूर्व भागातील द्राक्षांना देशातील व प्रदेशातील बाजार पेठ मिळाली नव्हती. त्यामुळे उत्पादकांनी पिकवलेली द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत कवडी मोलाने विकावी लागली होती. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान यंदा द्राक्ष बागायतदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
Agro News | सरकारच्या ‘काजू बी’ अनुदान योजनेला मुदतवाढ
“जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शेतकरी द्राक्ष छाटणीला सुरुवात करत असतात. परंतु यंदा द्राक्षांना मिळणारी बाजारपेठ व पावसाचा अंदाज घेत बागायतदारांनी द्राक्ष छाटण्या ऑक्टोबरमध्ये घेतले आहेत. सध्या छाटण्या सुरू केल्या असून वातावरणात बदल होत असल्याने शेतकरी सध्या सावध भूमिकेत आहेत” – संजय यादवाडे, द्राक्ष उत्पादक, लिंगनूर