Agro News | गेल्या पाच वर्षांपासून पाम तेलाच्या उत्पादनात घट होत असून सोयाबीनच्या उत्पादनात जागतिक पातळीवर वाढ होत आहे. सोयातेलासाठी गाळपहि वाढत आहे. तेव्हा सोयाबीनची अतिरिक्त निर्मिती होऊ लागली आहे. परंतु याचा परिणाम सोयाबीनच्या भावांवरती होऊ लागला आहे. त्याचबरोबर भारताच्या नॉन जीएम सोयाबीनच्या भावावरही याचा परिणाम दिसून येऊ लागलाय. असे ऑइल वर्ल्डचे कार्यकारी संचालक थॉमस मिल्के यांनी सांगितले.
Agro News | खानदेशात पावसामुळे पीकहानी थांबेना; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
पाम तेलाच्या उत्पादनात घट
“जागतिक खाद्यतेल मागणी पुरवठा आणि किंमत अंदाज” या विषयावर थॉमस मिल्के यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पामतेल आता स्वस्थ राहिले नासून पामतेलाच्या किमती सोया तेलापेक्षा जास्त आहेत. पाम तेलाचे उत्पादन वाढवायचे म्हटल्यास किमान चार ते पाच वर्षे लागतात त्यामुळे पाम तेलाचे कमी उत्पादन होत असल्याकारणाने 2025-26 या वर्षातही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. पामची आता लागवड केल्यास 2028 नंतर उत्पादन मिळेल यामुळे सध्या पाम तेल महाग होते आहे. असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सध्या पाम काढण्याचा हंगाम सुरू असून सप्टेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये काढणी सुरू होते. त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये पाम तेलाचा पुरवठा बऱ्यापैकी वाढेल याचा परिणाम म्हणजे काही काळ सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा पाम तेल स्वस्त राहील. पण सोयातेल आणि सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे कायमस्वरूपी ही स्थिती राहू शकणार नाही.
यावर्षी देखील सोयापेंड पुरवठा जास्त
2024 मध्ये जागतिक सोयाबीन गाळप मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यामुळे सोयातेल आणि सोयाबीनची निर्मिती वाढली आहे. 2024-25 च्या हंगामात देखील सोयातेलासाठी सोयाबीनचे गाळप 160 ते 170 लाख टणांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र यामुळे सोयाबीनचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. सोयातेलापेक्षा सोयाबीनच्या भावावर जास्त परिणाम दिसून येणार आहे. तेव्हा अतिरिक्त पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव कायम राहू शकतो असे सांगितले जात आहे.
Agro News | केळीच्या आवकीत घट; सणासुदीमुळे उठाव कायम
भारत उत्पादकतेच्या स्पर्धेत मागे
सोयाबीनची जागतिक पातळीवर मागणी वाढल्यामुळे उत्पादन आणि गाळपही वाढत आहे. त्यामुळे सोयातेल आणि सोयाबीन निर्मितीतही वाढ झाली आहे व पुरवठा वाढवल्यामुळे भावावर दबाव येत आहे. मात्र भारताला कमी उत्पादकतेमुळे स्पर्धेमध्ये टिकणे कठीण झाले आहे. जागतिक पातळीवर हेक्टरी 3 टन उत्पादकता असताना, भारतात केवळ 1 टन उत्पादकता आहे. उत्पादकता कमी असल्याने भारताला सोयाबीन आर्थिक दृष्ट्या परतावा देऊ शकत नाही. त्यासाठी भारताने हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. असे मिल्के यांनी यावेळी सांगितले. (Agro News)