North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी..?


North Maharashtra | आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. यानुसार राज्यातील बहुतांश भागांत कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, मुंबईतही कालपासून संततधार सुरू आहे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले असून, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर, रस्त्यांवरही वाहतूक कोंडी वाढली आहे. (North Maharashtra)

दरम्यान, असे असले तरी राज्यातील काही भागांत अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक भागांत शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतर पेरणी केली असून, आता त्यांना जोरदार पावसाची वाट पहावी लागत आहे. पंजाबराव डंख यांच्या अंदाजानुसार आज उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा असेल..? चला बघूयात…

Maharashtra Rain | पुढील आठवड्यात पावसाची स्थिती काय; उत्तर महाराष्ट्रात कसा असेल पाऊस..?

North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात कसा असेल पाऊस..?

नाशिक – नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पेरणी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सुरुवातीला एक दोन पाऊस हा अपेक्षेप्रमाणे झाला. त्यातही पाऊस कमी आणि वादळी वाराच जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर अनेक तालुक्यांमध्ये पावसाने विसावा घेतल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर, आजही नाशिक जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता असून, आज ढगाळ वातावरण असेल. तर, उद्या मध्यम स्वरूपात पाऊस असेल. (North Maharashtra)

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात आज मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागात आज चांगला पाऊस असेल. यामुळे पीकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. अहमदनगर जिल्ह्यात उद्याही मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि ढगाळ वातावरण असेल. तर, आज हवामान विभागाकडून अहमदनगर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही आज रिमझिम पाऊस असेल. अनेक तालुक्यांमध्ये रिमझिम स्वरूपातील पाऊस तर, काही भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची दाट शक्यता असून, आज येथे भागात ढगाळ वातावरण असेल. धुळे जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे. तर, जळगाव जिल्ह्यात आज मध्यम पाऊस असेल.(Rain Alert)

Maharashtra Rain | नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात एकदाच पाऊस; पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’

तर, हवामान विभागाकडून राज्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून, पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांन ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क आवाहन प्रशासनाने केले आहे. (rain update maharashtra)