Weather Update | राज्यात कमाल तापमानात घट; परभणीत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद


Weather Update | राजाच्या किमान तापमानातील घट कायम असून गारठा वाढला आहे. यंदा पहिल्यांदाच किमान तापमान 10° खाली घसरल्याने परभणी, धुळे, निफाड येथे हुडहुडी भरवणारी थंडी पडली आहे. आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather Forecast | आज किमान तापमानात चढ-उताराची शक्यता; कोकण, दक्षिण महाराष्ट्रात थंडीची प्रतिक्षा कायम

परभणीत हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका वाढू लागला असून सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील ‘सारसवा’ येथे देशाच्या सपाट भूभागावर 10.2 अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, राज्यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात राज्यात यंदा हंगामातील सर्वात नीचांकी म्हणजे 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर धुळे येथील कृषी महाविद्यालय व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 10 अंश तापमान नोंदवले गेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान 13 अंशा खाली आले असून उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

Weather Forecast | मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी; राज्यात अनेक ठिकाणी पारा 15 अंशाखाली

राज्यात कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात

राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा परा 30° च्या खाली आला असून कोकण व विदर्भात तापमान 30° च्या वर असले तरी कमाल तापमानात घट होत आहे. सोमवार दिनांक 25 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रुज येथे उच्चांकी 34.1 अंश तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)