Weather Update | राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान; ‘दाना’ चक्रीवादळाची तीव्रता ओसरली


Weather Update | राज्यात उन्हाचा चटका कमी होत असून तापमानात चढ-उतार जाणवत आहे. तर उघडीप दिलेल्या पावसाला पुन्हा पोषक हवामान तयार होत असून आज दि. 26 ऑक्टोबर रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Weather News | चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात घट होण्याची शक्यता

वादळी पावसाने विश्रांती घेताच कमाल तापमानात वाढ झाली असून तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35° च्या पार गेला आहे. शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रुज येथे राज्यातील उच्चांकी 35.5 अंश तापमानाची नोंद झाली. तसेच सोलापूर आणि डहाणू येथे 35 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमानात घट होणार असून नोव्हेंबमध्ये किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

तर आज दि. 26 ऑक्टोबर रोजी उन्हाचा चटका वाढून कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. तर उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून सोमवारपासून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather News | आज राज्यात पावसाची उघडीप; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

‘दाना’ चक्रीवादळ निवळले

बंगालच्या उपसागरातील ‘दाना’ चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे ओडिशाच्या भितरकणिका आणि धामरा जवळ धडकून जमिनीवर आले आहे. चक्रीवादळाची तीव्रता ओसरू लागली असून ओडिशाच्या भद्रकपासून 50 किलोमीटर ईशान्यकडे, 50 किलोमीटर वायव्यकडे असलेली ही प्रणाली उत्तर ओडिशाकडे सरकताना निवळणार आहे. (Weather Update)