Weather Update | आज राज्यात पावसाचा जोर वाढणार


Weather Update | राज्यभरात ‘ऑक्टोबर हिट’चा चटका वाढला असतानाच, परतीच्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज दि. 10 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update | राज्यातील काही भागात दोन-तीन पावसाचा मुक्काम

आज राज्यात पावसाचा अंदाज

मॉन्सूनने शनिवारी महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतली असून त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थबकली होती. महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यासाठी आता पोषक हवामान तयार झाले आहे. बुधवार 9 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये अकोल्यात 36.8 अंश उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून सांताक्रुज 36.6 अंश, जळगाव 35.4 आणि डहाणू येथे 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय

लक्षदीप बेट समूह व लगतच्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत वर्तविले गेले असून उत्तर कोकणापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather News | विदर्भात ‘ऑक्टोबर हिट’मुळे उन्हाचा कडाका वाढला

आज या भागात विजांसह जोरदार पावसाचा इशारा

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर. तर रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे , जळगाव, नंदुरबार, पुणे, नगर, सांगली, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, वाशिम, अकोला, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, धाराशिव या भागांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)