Weather Update | हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस गुजरात, मध्य प्रदेशचा काही भागासह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतीसाठी पोषक हवामान असणार आहे. परिणामी आज ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, अकोला, सातारा, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून वादळीवाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather News | विदर्भात ‘ऑक्टोबर हिट’मुळे उन्हाचा कडाका वाढला
पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम
IMD च्या अहवालानुसार, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील ४ उपविभागांमध्ये पावसाचा मुक्काम राहणार असून कोकण, गोव्यामध्ये आज आणि उद्या रोज काही ठिकाणी तर पुढील चार दिवसात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी तर, पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाड्यात पुढील आठवडाभर तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात देखील पुढील दोन दिवस काही ठिकाणी त्यानंतर चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Weather Update | आज दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात उन्हाचा उकाडा कायम
आज या भागांमध्ये पावसाची शक्यता
आज ९ ऑक्टोबर रोजी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात सातारा, नाशिक, पुणे, सांगली तसेच मराठवाड्यात नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि विजांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. (Weather Update)