Weather Update | मॉन्सून ने महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. तर ‘ऑक्टोबर हिट’चा चटका आता जाणवू लागला आहे. यातच पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे, वीजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच उर्वरित ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Weather News | आज राज्यात ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू
नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला असून शनिवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात काही भागातून माघार घेतली आहे. दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माणसं परतण्यासाठी पोषक हवामान आहे. तर बंगालच्या उपसागरातून तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यात राज्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यभरात उकाडा वाढला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा 35 च्या पार
रविवार दिनांक 6 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये ब्रम्हापुरी येथे राज्यातील उच्चांकी 36.2 तापमानाची नोंद झाली तर अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर येथे तापमानाचा पारा 35 अंशाच्या पार होता. आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा कायम असून उर्वरित राज्यात उन्हाचा कडाका कायम राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
आज या भागात पावसाचा येलो अलर्ट:
आज सातारा, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा देण्यात आला आहे.
Weather Update | आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
या भागात 35 अंशापेक्षा अधिक तापमान:
तर अकोला 35.8, ब्रह्मपुरी 36.2, चंद्रपूर 35, नागपूर 35.6, वर्धा 35. (Weather Update)