Weather Update | आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता


Weather Update | परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. काही ठिकाणी अधून मधून जोरदार पाऊस पडत असून कोकण, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये हलक्या तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापुरातील मैंदर्गी येथे 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Weather Update | राज्यात पावसाचा जोर ओसरताच उन्हाचा कडाका वाढला

राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी

पावसाने घेतलेला विश्रांतीमुळे उन्हाचा कडाका वाढला असून काही ठिकाणी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होते. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा नडगाव येथे हलक्या सरी बरसल्या असून रायगडातील चौकी येथे 31 मिमी, बिरवडी 23 मिमी तर नेरळ कळंब, कशेले, लोणेरे, वाकण येथे तुरळ ठिकाणी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक मधील बेळगाव येथे 36 मिलिमीटर तर नडगाव, बनगाव येथे हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यात पहाटे धुके, सकाळी ऊन तर दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत असून दौंड येथे 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नगर जिल्ह्यातील बेलवंडी येथे 46 मिमी, कोळगाव 41, चिंबळा 30, टाकळी 27 मिमी तर काष्टी, पेंडगाव, भांबोरा, खर्डा या भागात हलका पाऊस झाला. सोलापुरातील वळसाल 31 मिमी, सुरडी 30, अक्कलकोट 29, दुधनी 44, मैंदर्गी 62, वागदरी 30, दारफळ 39, म्हैसगाव 49, जेऊर, उमरड 38 मिलिमीटर तर साताऱ्यातील कुमठे 24 मिमी, किन्हई 48 मिलिमीटर तसेच सांगलीतील मनेराजुरी 36, कवठेमहांकाळ 55 तर खानदेशातील जळगावतील अंतुर्ली येथे 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Weather News | मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान तयार; आज दक्षिण महाराष्ट्रात वादळीवाऱ्यांसह पावसाचा अंदाज

पावसामुळे कापूस वेचणीच्या कामात अडथळा

त्याचबरोबर, मराठवाड्यातील जालन्यातील वडीगोद्री येथे 27 मीमी, बीड मधील दिदरूड येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर परभणीतील गंगाखेड, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी येथे हलक्या स्वरूपाच्या सरीवर बरसल्या. विदर्भ, अकोला, यवतमाळमध्ये तुरळक सरी बरसल्या असून अकोल्यातील मूर्तिजापूर येथे हलका तर यवतमाळ मधील सावर येथे 39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कापूस वेचणीच्या कामात अडचणी येत आहेत. (Weather Update)