Weather Update | राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बरसत असून आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील 3 दिवस म्हणजेच 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून या दरम्यान, हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे व सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
Weather News | राज्यात पावसाचा इशारा कायम; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
पावसासह गारपीटिचा ही इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले असल्यामुळे, पुढील 3 दिवस राज्यात वादळीवार आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुढील 24 तास वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून हवामान राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे आणि विजांसह काही भागात आज गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
Weather Update | राज्यभरात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; सतर्कतेचा येलो अलर्ट कायम
आज ‘या’ भागात पावसाचा इशारा
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)