Weather Update | मान्सून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे उन्हाचा चटका वाढला असून ‘ऑक्टोबर हीट’ चे चटके अनुभवायला मिळत आहेत. तर आज सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यांमध्ये मुख्यतः हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा
उत्तर कोकण ते आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर उर्वरित राज्यांमध्ये पावसाची उघडीप असून उन्हाचा चटका वाढला आहे. तेव्हा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हिट’ अनुभवायला मिळत आहे.
Weather Update | मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता
उन्हाचा कडाका वाढला
सोमवारी 30 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी 36°c तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, नागपूर, अकोला, वर्धा येथे उन्हाचा पारा 35°c च्या पार गेला. राज्यात अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 33 अंशावर पोहोचले असून सातारा, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. (Weather Update)