Weather Update | मॉन्सूनचा उत्तर भारतातून काढता पाय; दोन दिवसांत उर्वरित भागांतून मॉन्सून परतणार


Weather Update | नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मॉन्सूनचा प्रतीचा प्रवास थबकत सुरू असून शनिवारी दि. 5 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या परतीची वाटचाल थांबली. त्यानंतर शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी उत्तर भारतातून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Weather News | आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची अंदाज; येलो अलर्ट कायम

मॉन्सूनची परतीची वाटचाल मंदावली

23 सप्टेंबर पासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वायव्य राजस्थान आणि पश्चिम कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला होता. 24 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब व हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थोडी मंदावली होती. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी अवघ्या 8 दिवसांनी मान्सूनने परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला व शनिवारी 5 तारखेला मानसूनने उत्तर प्रदेश, गगुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागास उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या काही भागातून आपला तळ हलवला.

Weather Update | आज राज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान

परंतु, पुन्हा मॉन्सूनची वाटचाल थांबली आणि शुक्रवारी (11) संपूर्ण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग झारखंड, बिहार छत्तीसगड, राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेत दरभंगा, पेंद्रा रोड, हजारीबाग, नरसिंगपूर, नंदुरबार, खारगाव, नवासरीपर्यंतच्या भागातून माघार घेतली आहे. तसेच मॉन्सूनच्या पतीसाठी पोषक हवामान तयार होत असल्याने दोन दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, बिहारच्या उर्वरित भागासह झारखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)