Weather News | यंदा ऐन दिवाळीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही भागात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले. तर राज्याच्या काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे संकट कायम असून त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल कधी लागणार? असा प्रश्न पडला आहे. त्यात थंडी पडण्यासारखी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.
Weather Forecast | नोव्हेंबर महिन्यात देखील उन्हाच्या झळा; गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम
आय.एम.डीच्या माहितीनुसार, आज दि. 5 नोव्हेंबर रोजी कोकणात पावसाची दाट शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटस हलक्याते माध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Weather Forecast | ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज; राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा
राज्यात थंडीची चाहूल कधी?
तर राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 33°c आहे तर किमान तापमान हे 22°c वर पोहोचले आहे. तेव्हा येत्या काही दिवसात राज्यात थंडीचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये बाष्पोत्सर्जनाचा वेग काहीसा वाढलेला असल्यामुळे 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी आणि कमाल तापमान सरासरी एवढे तर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. (Weather News)