Weather News | राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवू लागला असून धुक्याच्या चादरीसह दव पडत आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आज दि. 28 ऑक्टोबर रोजी कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार
बंगालच्या उपसागरातील ‘दाना’ चक्रीवादळ जमिनीवर येताच निवळले असून उत्तर ओडिषा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर नैऋत्य अरबी समुद्रा चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून आकाश निर्भर झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत आहे. ज्यामुळे उन्हाचा चटका वाढल्याचे जाणवत आहे. तर पहाटेच्या वेळी हवेत गारवा वाढला असून राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
पावसाला पोषक हवामान
तर रविवार दि. 27 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये सोलापुरात राज्यातील उच्चांकी 35.4 अंश तापमानाची नोंद झाली असून सांताक्रुज ब्रह्मपुरी आणि अकोला येथे 35 अंशापेक्षा अधिक तर जळगाव, परभणी, वाशिम येथे 34 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील उच्चांकी 15.6°c तापमानाची नोंद झाली असून राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. ज्यामुळे रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे.
Weather News | चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज
आज ‘या’ भागात पावसाचा अंदाज:
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, कोल्हापूर, हिंगोली, सांगली, नांदेड. (Weather News)