Weather News | चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज


Weather News | पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकलेल्या ‘दाना’ चक्रवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार असून त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यसह मुंबईत थंडी ऐवजी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.

Weather News | आज राज्यात पावसाची उघडीप; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज

विशेष म्हणजे, संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालला धडकलेल्या दाणा चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात दि. 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

Weather Forecast | अखेर परतीच्या पावसापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार!

ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

तर, दि. 25 व 26 ऑक्टोबरला वातावरणात काहीसा गारवा असेल मात्र विशेष थंडी जाणवणार नसून हवामान अभ्यासात अश्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरासह शुक्रवार, शनिवारी व रविवारी रात्री व पहाटे अल्हाददायक वातावरण राहील. तर सोमवारनंतर ऐन दिवाळीत मुंबई सह कोकणात व राज्यात संध्याकाळच्या वेळी पावसाची शक्यता असून १५ नोव्हेंबर पर्यंत थंडीचे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. (Weather News)