Weather News | पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्ट्यात सर्वाधिक पावसाची नोंद


Weather News | राज्यभरात ठिक-ठिकाणी मागील दोन-तीन दिवस मान्सूननंतर पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत कोकणातील ठाणे जिल्ह्यातील नयाहडी येथे 92 मिलिमीटर इतका सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले असून मध्य महाराष्ट्रातील नागरिकांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली.

Weather News | आज उत्तर कोकणातील मध्य व उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, अधून मधून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील धसई येथे 24 मिलिमीटर, भिवंडी, खारबाव, बलकुम येथे 61 मिलिमीटर, सरळगाव, देहरी येथे 55 मिलिमीटर पाऊस झाला असून, रत्नागिरीतील बुरंडी येथे 35 मिलिमीटर, अंगवली, पुनस येथे 31 मिलिमीटर, देवरुक 32 मिलिमीटर, सिंधुदुर्गातील आंबेरी येथे 46 मिलिमीटर, वालावल, वैभववाडी, येडगाव 34 मिलिमीटर, पिंगळी 39 मिलिमीटर तर पालघर मधील विरार येथे 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ

त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली असून पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. आंबेगाव येथे सर्वाधिक 55 मिनिटे पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळत असला तरी भुईमूग, सोयाबीन, बाजरी सारख्या पिकांच्या काढणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पुरतीच तारांबळ उडाली आहे.

Weather Update | मॉन्सूनचा उत्तर भारतातून काढता पाय; दोन दिवसांत उर्वरित भागांतून मॉन्सून परतणार

पावसामुळे शेती कामांना रोख

सोलापूर येथील माळशिरस आणि अकलूज येथे 45 मिमी पाऊस पडला असून, टेंभुर्णी येथे 31 मिमी, लवंग 38 मिमी, साताऱ्यातील उंडाळे, तळमावले येथे 50 मिमी, मलकापूर 41, मलवडी 47 मिमी, मायणी 58 मिमी, सांगलीतील वळवा येथे 47 मिमी, कुरलप, चिकुर्डे येथे 58 मिमी, सागाव 42 मिमी, कोकरूड येथे 57 मिमी पाऊस झाला. तर कोल्हापुरातील मलकापूर येथे 56 मिमी तर आंबा येथे 38 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतीकामांना रोख लागला आहे. (Weather News)