Weather News | बंगालचा उपसागरात निर्माण झालेली वादळी प्रणाली यामुळे राज्यात थंडीची लाट आली असून आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात ही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, राज्याच्या किमान तापमान वाढण्याची शक्यता असून थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Weather Update | राज्यात कमाल तापमानाचा पारा घसरला; मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाट
देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा कडाका वाढला असून गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी देशाच्या सपाट भूभागावर मध्य प्रदेश येथील ‘मंडला’ येथे नीचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात धुळ्यातील कृषी विद्यालय, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 8 अंश तापमान नोंदवले गेले. तसेच परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पुणे आणि अहिल्यानगर येथे तापमानाचा परा 10 अंशाच्या खाली घसरला होता.
चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेस ढगाळ वातावरण राहणारा
तर गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश तापमान नोंदवले गेले. तर आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे येथे थंडीची लाट कायम राहणार आहे. तर उद्यापासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असून थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; तापमानाचा पारा 10 अंशाखाली
बंगालचा उपसागरात आज चक्रीवादळाचा अंदाज
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील नैऋत्य दिशेला वादळी प्रणाली तीव्र होत असून गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ही प्रणाली पुद्दुचेरी पासून 410 किलोमीटर व चेन्नई पासून 480 किलोमीटर आग्नेयकडे होती. आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता असून हे वादळ श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत धडकण्याचा अंदाज आहे.(Weather News)