Weather News | दिवाळीनंतर राज्यात तापमानात घट झाली असून हळूहळू गारवा पडायला सुरुवात झाली होती. अशातच पश्चिम बंगाल व चेन्नई येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती उद्भवली असून यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडीसह काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; राज्याच्या कमाल व किमान तापमानात तफावत
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हावामानात मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय. काही शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरला असून राज्यात पुढील काही दिवसांत थंडी आणखीन वाढणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या काही तासात पाऊस पडण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता
आय.एम.डी.च्या अहवालानुसार, पश्चिम बंगाल व चेन्नईकडे सायक्लोन सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून परिणामी पुढील तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील किनारपट्टीच्या गावांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला असून यानंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Weather Update | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
राज्यात अजूनही संमिश्र वातावरण
तर मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई सकाळच्या सुमारास सध्या गारवा जाणवत असून येत्या दोन दिवसात तापमानात अधिक घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानात घट होणार असून त्यामुळे राज्यात थंडी आणखीन वाढणार असल्याचा अंदाज आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी सकाळी धुके व थंड हवा जाणवत असून काही ठिकाणी दमट वातावरण आहे. (Weather News)