Weather News | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज दि. 9 नोव्हेंबर रोजी राज्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. आय.एम.डीच्या अहवालानुसार, बंगालचा उपसागरात येत्या 48 तासांमध्ये चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे, मुंबई, उपनगर व नवी मुंबईसह राज्यात पहाटेच्या वेळी गारवा तर दिवसभर उकाडा जाणवत आहे.
Weather Update | अखेर प्रतिक्षा संपली; राज्यात थंडीचे आगमन
15 नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता
पहाटेच्या वेळी थंड वारे वाहत असल्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच पुणे, नाशिक, सांगली, जळगाव, नागपूर या जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे तापमानाच्या पाऱ्यात सर्वाधिक घट झाली असून काही जिल्ह्यात रात्री कडाक्याची थंडी जाणवायला लागली असल्यामुळे गरम कपडे, स्वेटर कपाटातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. तर थंडीपासून वाचण्यासाठी नागरिक शेकोटीचा सहारा घेऊ लागले आहेत. येत्या काही दिवसात राज्यो थंडी वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणात देखील सकाळी थंडी व दुपारी उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्याचबरोबर, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात देखील थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. .
Weather News | बे ऑफ बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशन; राज्याच्या हवामानावर काय परिणाम होणार?
उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात थंडी
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यभरात थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून दिवाळीनंतर पुण्याच्या तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. पुण्यात आज दोन अंशाने तापमानात घट झाली असून पुढील काही तासांत तापमान आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या शहरात सकाळी, संध्याकाळी व रात्री थंडी पडत असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात किमान तापमान 15°c पर्यंत खालावले आहे. तर 8 नोव्हेंबर रोजी नाशिक मध्ये राज्यातील निच्चांकी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. (Weather News)