Weather News | राज्यामध्ये थंडी सदृश्य वातावरण निर्माण झाले असून हा पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या दोन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी थंड वारे सुटत असून दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल; आज किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
ला नीनोचा परिणाम जाणवणार
आय.एम.डी.च्या अहवालानुसार, यावर्षी देशभरात नोव्हेंबर महिन्यात ला नीनोचा परिणाम दिसेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात उष्णता जाणवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज दिनांक 7 नोवेंबर रोजी दिवसा वातावरण कोरडे राहणार असून रात्री आणि पहाटे तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमान 17 ते 19 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील ग्रामीण भागात हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अद्यापही तापमानात अपेक्षित घट नाही
तसेच पश्चिम बंगालच्या खाडीत दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ला नीनोचा प्रभाव असल्याने नोव्हेंबरचा दुसरा आठवडा आला तरी अजून तापमानात अपेक्षित घट न झाल्याचे ही हवामान विभागाने सांगितले आहे. बे ऑफ बंगालच्या खाडीत होत असलेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशन व त्यामुळे होणारे बदल यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. सध्या त्याचा थेट महाराष्ट्राच्या हवामानावर कोणताही परिणाम होत नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून हा प्रभाव किती दिवस राहणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Weather News | दिवाळीनंतर देखील राज्यात अवकाळी चे संकट कायम; कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!
आज कमाल व किमान तापमानात तफावत
तर दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली असून आज बहुतांश जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. सातारा जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढला असून दिवसा उन व रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाली असून आज तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 30 अंशाच्या पार राहणार आहे. (Weather News)