Weather Forecast | सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे राज्याच्या हवामानात सतत बदल होत असून संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. तमिळनाडू व केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मुंबईसह, उपनगर आणि महाराष्ट्रात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने उकाडा जाणवत आहे. गेल्या 24 तासात तापमानात कोणतीही घट झालेली नसून येत्या 24 तासांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता कमी आहे.
Weather News | उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम; आज कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा
आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
आय.एम.डी.च्या अहवालानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. वीज पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असून कोल्हापूर, पुणे, सातारा, लातूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून आंबा व काजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसणार आहे.
हवामानात बदल होत असल्यामुळे थंडीचे प्रतीक्षा कायम
दरम्यान, पुढील पाच दिवसात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मात्र सायकलोनिक सर्क्युलेशनमुळे हवामानात बदल होत असल्यामुळे थंडीची प्रतीक्षा कायम राहणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर पुन्हा कमी झाला असून दक्षिण, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण रहाणार असून कमाल तापमान 32°c व किमान तापमान 22°c इतके असेल. गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यातील काही भागात पाऊस झाला आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तर जिल्ह्यात कमाल 31°c व किमान 20°c अंश सेल्सिअस तापमान असेल.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गाराठा वाढला; कोकणात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम
येत्या दोन दिवसात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता
सांगली जिल्ह्यात देखील पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथे 32°c कमाल तर 22°c किमान तापमान असेल, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आज कोल्हापूरचे कमाल तापमान 30°c तर किमान तापमान 21°c असणार आहे. तर येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Forecast)