Weather Forecast | राज्यात थंडीचा जोर ओसरला; उत्तर महाराष्ट्रात मात्र पारा 10 अशांखाली


Weather Forecast | ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राजाच्या हवामानात बदल झाले असून ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. शिवाय किमान तापमानात होत असलेल्या वाढीमुळे राज्यातील गारठ्याचे प्रमाण देखील काहीसे कमी झाले आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका कायम असून आज दिनांक 2 डिसेंबर रोजी राज्यभरात ढगाळ वातावरणातसह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या दक्षिणेस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Weather Forecast | राज्यात थंडीचा कडाका कायम; जेऊर येथे हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी देशाच्या सपाट विभागावर मध्य प्रदेशातील ‘नवगांव’ येथे नीचांकी 7.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर राज्यात किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली असली तरी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 6.1 अंश तापमानाची नोंद झाली तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात तापमान 10.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, उर्वरित राज्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत आहे.

रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 34.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज दिनांक 2 डिसेंबर रोजी राज्यात ढगाळ हवामान राहणार असून किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजयांसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Weather News | मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळले

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळ जमिनीवर धडकले असून उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सक्रिय आहे. तर ही प्रणाली पुद्दूचेरीजवळ असून पश्चिमेकडे सरकत आहे. वादळाची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली असून या प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून राज्यामध्ये ढगाळ हवामान झाले आहे. (Weather Forecast)