Weather Forecast | आज राज्यात विजांसह पावसाचा इशारा!; तापमानात चढ-उतार कायम


Weather Forecast | राज्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. तर आज दि. 13 नोव्हेंबर रोजी कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather News | बंगालच्या उपसागरात सायक्लोन सर्क्युलेशन; राज्याच्या हवामानावर काय परिणाम होणार?…वाचा सविस्तर

काही भागात पाऊस तर उर्वरित तापमानात चढ-उतार

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान 36 अंशांच्या पार गेले होते. परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये गोंदिया व भंडारा येथे राज्यातील उच्चांक 34 पूर्णांक 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उर्वरित राज्यात तापमानात घट झाल्याने परा 34 अंशाच्या खाली आहे. तर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज ही वर्तवण्यात आला आहे.

दोन दिवसांत मॉन्सून माघार घेण्याची शक्यता

मॉन्सूनचा परतीचा प्रवास थबकत होत असून नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतल्यानंतर आठवडाभर राज्यात परतीच्या पावसाची वाटचाल रखडली होती. शुक्रवारी उत्तर भारतातून मान्सूनने माघार घेतली असून परतीला पोषक हवामान तयार झाल्याने दोन दिवसांत मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असताना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैऋत्य बंगालचे उपसागरात उद्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; राज्याच्या कमाल व किमान तापमानात तफावत

आज ‘या’ भागात विजांसह पावसाचा इशारा

आज राज्यातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, नाशिक, पुणे, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Forecast)